Preloader

वेबिनार – ' महाराष्ट्रातील खाजगी शाळांमधीलशिस्तभंगाची कार्यवाही: कायदा आणि प्रक्रिया'

महाराष्ट्रातील खाजगी शाळांमधील शिस्तभंगाची कार्यवाही: कायदा आणि प्रक्रिया’
वेबिनार | २४ एप्रिल २०२१ | दुपारी ४ वाजता
महाराष्ट्रातील शिक्षण प्रसारात खाजगी शाळांचा महत्त्वाचा वाटा आहेतथापि, खाजगी शाळांमधील शिस्तभंगाची कारवाई हा संस्थाचालक व कर्मचारी यांच्यातील सौहार्दाला तडा जाण्यास कारणीभूत ठरणारा तसेच कर्मचारी आणि संस्थाचालक यांचे परस्पर हक्क व जबाबदाऱ्या याबाबत संघर्ष निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे.
शिस्तभंगाच्या कारवाईतून निर्माण होणारे वाद अनेक वेळा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचून संस्थाचालक व कर्मचारी यांच्यात कायमचे वितुष्ट निर्माण करतात.
उपरोक्त परिस्थितीत  महाराष्ट्रातील खाजगी शाळांमधील शिस्तभंगाची कार्यवाही: कायदा आणि प्रक्रिया  या विषयावर ‘EduLegaL’ वेबिनार चे आयोजन करीत आहे. सदर वेबिनार मध्ये गैरवर्तनाचे प्रकार, शिस्तभंगाच्या चौकशीची प्रक्रिया, चौकशीदरम्यान घ्यावयाची काळजी, इत्यादींबाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्या काही महत्त्वपूर्ण न्याय निर्णयावर देखील चर्चा केली जाईल.
सदर वेबिनार चा तपशील पुढील प्रमाणे आहे –
वक्ते: श्री. उन्मेष दिंडोरे, अॅडव्होकेट, संस्थापक “लेक्स अक्वीलाय”
वेबिनार मधील चर्चेचे महत्वाचे मुद्दे: 
·    कायद्यात नमूद गैर वर्तनाचे प्रकार
·    संस्थाचालक व कर्मचारी यांचे हक्क व जबाबदाऱ्या
·    शिस्तभंग कारवाईची योग्य प्रक्रिया ( नोटीस, इतिवृत्त लेखन, कागदपत्रांचे जतन)
·    पुरावा नोंदीची योग्य पद्धती
·    चौकशी अहवाल लेखनाची योग्य पद्धती
वेबिनार साठी अपेक्षित घटक
·     संस्थाचालक,
·     मुख्याध्यापक व शाळांचे प्रमुख,
·     खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
नोंदणी लिन्क: नोंदणी फॉर्म 
आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. वेबिनार संपल्यावर उपस्थितीबाबत ‘EduLegaL’ तर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.
वक्त्यांविषयी माहिती:
अॅडव्होकेट श्री. उन्मेष दिंडोरे हे वकिली व्यवसायात कार्यरत असून सुमारे पाच वर्षाहून अधिक काळ ‘EduLegaL’ शी निगडीत आहेत. श्री दिंडोरे यांनी शाळा व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे दाखल प्रकरणांचे काम पाहिले आहे.
‘EduLegaL’ विषयी माहिती
‘EduLegaL’ ही शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य असलेल्या कायदे तज्ञांची / विधीज्ञांची संस्था आहे शिक्षण क्षेत्रातील कायद्यांविषयी सल्ला, मार्गदर्शन व कायदेशीर प्रक्रियेतील सहभाग याद्वारे शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांना ‘EduLegaL’ सेवा पुरवीत आहे.
EduLegaL | mail@edulegal.in | + 91 8698974348
 

Print Article
View Posts By Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP